गजानन महाराज सेवा मंडळ आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

      

अंबरनाथ  : येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळ आणि एस आय सी ई एस विद्यालयामधील एस एस सी 1987  च्या बॅचचे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 38 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. 
      श्री गजानन महाराज सेवा मंडळाचे उपासना केंद्र, स्टेशन विभाग, अंबरनाथ येथे हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून जास्तीत जास्त बाटल्या रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. 
     एस आय सी ई एस 1987 मधील एस एस सी चे माजी विद्यार्थी आणि श्री गजानन महाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. करोनाचे लसीकरण, वरचेवर झालेले रक्तदान शिबीर या पार्श्वभूमीवर सुमारे चाळीस रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता आणि 38 बाटल्या रक्त जमा झाले. सर्व रक्तदात्यांचे श्री गजानन महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार दलाल, माजी विद्यार्थी संघाचे दीपक रेवणकर आणि मुकेश विसपुते यांनी आभार मानले. 
          समर्पण ब्लड बँकेचे डॉ. रमेश सिंग, दीपेश सरदार, प्रकाश ऐवळे, सना शेख, शीला वाघमारे, विजय मोहिते, मंगेश, कुणाल शेळकर, अभिषेक मौर्य, शुभम जाधव, प्रदीप लोंढे यांचे सह आयोजक संस्थेचचे पदाधिकारी यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...