पालकांना सरकारचा मोठा दिलासा; खासगी शाळांची १५ टक्के शुल्ककपात होणार

मुंबई :- खासगी शाळांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. यानुसार  खासगी शाळांचे शुल्क १५ टक्के कमी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टानेही काही दिवसांपूर्वी खासगी शाळांच्या शुल्कसंदर्भात सरकारला महत्वाचे निर्देश दिले होते. खासगी शाळांचे शुल्क कमी करण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती. शिवाय मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...