आशिष दामले यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचे राज्यपालांकडून कौतुक, 'कोरोना योद्धा' सन्मान देऊन गौरविले

बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष आशिष दामले यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते 'कोरोना योद्धा' सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
     मुंबईतील जेदल फाऊंडेशनच्या वतीने कोविड-१९ साथीच्या काळात कोरोना संक्रमणाच्या बचावासाठी जाणीव जागृती करण्यापासून बाधित रुग्णांना मदत करण्यापर्यंत सेवा देणाऱ्या नागरिकांचा रविवारी (ता.२६) 'कोरोना योद्धे' म्हणून सन्मान करण्यात आला. त्याअंतर्गत आशिष दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल आशिष दामले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर या सर्व संकट काळात माझ्या वतीने मी योगदान देऊ शकलो याचे मला समाधान आहे.माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना अशी कौतुकाची थाप पुढील काम करण्यासाठी अतिशय प्रेरणादायी असते, या कौतुकासाठी पुनश्च आभार! अशा शब्दांत आशिष दामले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

राज्यपालांना बदलापूर भेटीचे आमंत्रण
यानिमित्ताने आशिष दामले यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना बदलापूर भेटीचे आमंत्रण दिले.अतिशय स्वस्तात सकस आहार देणाऱ्या ताईज किचनच्या तीन शाखांचा विस्तार, ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे वाचनालय, जेनेरिक औषधांचे दुकान आदी बदलापूरमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल राज्यपालांना माहिती दिली. या उपक्रमांचे राज्यपालांनी कौतुक केले. सार्वजनिक वाचनालयाची संकल्पना तर त्यांना फारच आवडली आणि लवकरच भेट देऊन पाहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...