कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रातील शालेय विदयार्थ्यांसाठी नवीन आधार कार्ड काढण्याकरीता नगरपरिषदेद्वारे विशेष मोहिम राबविण्यात आली. या
विशेष मोहिमेतंर्गत एकूण ४३८ विदयार्थ्यांचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले तर ९६ विदयार्थ्याच्या आधार कार्डचे अदयावतीकरण करण्यात आले
शिक्षण संचालनालय पूणे व पंचायत समिती अंबरनाथ यांच्या निर्देशनानुसार, शाळा संच मान्यता करीता विदयार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा पुरेशी विदयार्थी संख्या असूनही शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती शिक्षक वर्गात असते. याशिवाय कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या शाळांतील बहुतांश विदयार्थी, तळागाळातील कामगार वर्गाचे पाल्य असल्याने रोजगार बुडवून आधार कार्ड केंद्रावर जाणे शक्य होत नाही तसेच बहुतांशी पालकांकडे रितसर पुरावे उपलब्ध होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या पुढाकाराने शालेय शिक्षण विभाग प्रमुख व नोडल ऑफिसर आधार कार्ड सेंटर विलास जडये यांनी सदर आधार कार्ड नोंदणी शिबीर १) कु.ब.न.प डिजीटल शाळा, कुळगाव २) कुळगाव उर्दु ३) कु.ब.न.प. डिजीटल शाळा ज्युवेली ४) ,कु.ब.न.प. बेलवली शाळा ५) कु.ब.न.प डिजीटल शाळा एरंजाड या पाच केंद्रावर राबविण्यात आले.
या आधार कार्ड नोंदणी शिबीरामूळे कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे सर्व पालक व शिक्षक वर्गातून कौतूक होत आहे. समाजातील वंचित, श्रमिक कामगार, दलित, गरिब व मध्यमवर्गिय पालकांना विशेष ओळख मिळवून देण्याच काम या आधार कार्ड मोहिमेद्वारे करण्यात आले. ही मोहिम दि. २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२१ पर्यंत तीन केंद्रात राबवण्यात आली या . सदयस्थितीत कुळगावं बदलापूर नगरपरिषद शाळांचा एकूण पट २१९० असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.