अंबरनाथ :- महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा अंबरनाथ यांच्यातर्फे सोमवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन ई महाभूमी राज्य प्रकल्प समन्वयक यांनी तलाठी संवर्गासाठी असंविधानिक शब्द वापरल्याने झाले. त्यांची तात्काळ इतर विभागात बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंबरनाथ येथील धरणे आंदोलनात अंबरनाथ तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे तालुकाध्यक्ष बी.के. पट्टे बहादूर सरचिटणीस विकास ढेहरेंगे यांच्यासह सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सहभागी होते. त्याप्रसंगी संघटनेच्यावतीने तहसीलदार प्रशांती माने यांना निवेदनही देण्यात आले. संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या मागणी नुसार कारवाई न झाल्यास संघटनेने आपल्या निवेदन पत्रात आंदोलनाची भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे.
दिनांक ७ व ८ ऑक्टोबर २०२१ ला काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज करणे.
२) दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी तहसिल कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शने करतील.
३) दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी मा. तहसिलदार सो, यांचेकडे डी. एस. सी.जमा करणे. रामदास जगताप यांची अन्यत्र बदली न झाल्यास दि. १३ ऑक्टोबर २०२१ पासून सर्व कामावर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलन कालावधीमध्ये नैसर्गीक आपत्ती व निवडणूक आयोगाचे काम आदेशाप्रमाणे करतील. असेही निवेदन पत्रकात नमूद करण्यात आले आहे