कोरोना योद्यांचा सन्मान करून रेल्वे प्रवासी मित्रमंडळाचे दसरा स्नेहमीलन संपन्न


 बदलापूर :-  कोरोना योद्यांचा सन्मान  करण्याबरोबरच  रेल्वे कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान करून  रेल्वे प्रवासी   मित्रमंडळाच्या वतीने दसरा स्नेहमिलन साजरा करण्यात आला.
 संघटनेचे अध्यक्ष रमेश महाजन यांच्यावतीने गेल्या सुमारे १६ वर्षांपासून दसऱ्याच्या आदल्या दिवशी रेल्वे फलाटावर स्नेहसंमेलनाचे आयोजन करतात, मागील वर्षी कोरोनामुळे रेल्वे प्रवास करण्यावर काही प्रमाणत निर्बंध होते , यावर्षी थोड्या प्रमाणात प्रवासी प्रवास करू लागल्याने त्याच उत्साहात आज  दसऱ्याचे स्नेहमिलन साजरे करण्यात आले. 
   आज सकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी तसेच ७. ५७ आणि ८. १३ व ९.२५ वाजून बदलापूर हुन मुंबईला जाणाऱ्या लोकल फुलांच्या माळांनी  सजवण्यात आल्या.  महिला प्रवाश्यांनी फलाटावर भोंडला, गरब्याचा फेर धरला, भजने, कीर्तने आणि आरत्या करण्यात आल्या , मिठाईचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.  रेल्वे प्रवासी मित्रमंडळाच्या वतीने कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला. विशाल मोरे , ओंकार महाजन, दिलीप राजे, साकेत पटलवार, दीपिका नाडकर्णी,बबन घोलप, जान्हवी चौलकर, भावना कुमावत आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...