डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न

बदलापूर :-विज्ञान हे प्रगत असून यात सारखे शोध लागत असतात त्यामुळे नवीन लागलेले शोध आणि वैज्ञानिक यांच्या बद्दल विदयार्थ्यांनी वाचन करावे. विदयार्थ्यांमध्ये  विज्ञानाविषयी जिज्ञासा तसेच शोध वृत्ती विकसित व्हावी  असा डॉ. होमी भाभा बालवैज्ञान  या परीक्षेचा मूळ उद्देश आहे.  कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळांमधील इयत्ता ६वी चे १४ व इयत्ता ९ वी ६ विदयार्थी या परीक्षेकरीता बसले आहेत तरी परीक्षे विषयीची संपूर्ण माहिती विदयार्थ्यांना मिळाली या करीता कु.ब.न.प डिजीटल शाळा क्र. १ कुळगाव येथे दिनांक २१-१०-२०२१ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 
  कुळगाव शाळेमध्ये डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक कार्यशाळा तज्ञ शिक्षिका सौ. अमृता सावंत यांनी विदयार्थ्यांना विज्ञानाची शोध नजर जोपासण्यास सांगितले. तसेच परीक्षेचा नमुना व कार्यपध्दतीने विदयार्थाना विषद केला. सदर कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून शाखा प्रबंधक श्री. सुहास पटवर्धन सर उपस्थित होते तसेच कार्यशाळेला मार्गदर्शन अमृता सावंत मॅडम यांनी केले. या प्रसंगी कार्यशाळेला शिक्षण विभाग प्रमुख श्री. विलास जडये सर व कुळगाव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा राऊत मॅडम उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. विजय बावीस्कर सर यानीं केले मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश गोडसे साहेब यांच्य मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.
विदयार्थ्यांनी विज्ञानाची शोध नजर जोपासावी अमृता सावंत (तज्ञ शिक्षिका ) कुळगाव बदलापूर नगरपरिषद शिक्षण विभाग विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी इयत्ता ६ वी व ९ वी च्या विदयार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा मुंबईच्या विज्ञान शिक्षक परीषदेच्या माध्यमातून घेतली जाते. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादूर्भावामूळे ही परीक्षा झाली नाही. या वर्षी ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...