अंबरनाथकरिता १० एमएलडी वाढीव पाणीपुरवठा करण्यात यावा - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे एम.आय.डी. सी.अधिकाऱ्यांना सूचना


अंबरनाथ :-  शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाणीपुरवठा मंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान अंबरनाथ शहरातील वाढत्या पाणीटंचाई संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अंबरनाथकरिता वाढीव १० एम.एल.डी. पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी एम.आय.डी. सी.च्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अंबरनाथची सन २०४८ ची लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात शहराला पाणीटंचाई उदभवू नये याकरिता नियोजन करण्याच्या दृष्टीने पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी  मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा, एम.आय.डी. सी. व पाणीपुरवठा विभागा सोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी केली यावर सकारात्मक प्रतिसाद देत सदर बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच मजीप्राच्या ग्राहकांकरिता आठवढ्याभरात अभय योजना लागू करण्यात येणार असल्याचे ही पाणीपुरवठा मंत्री ना.पाटील यांनी सांगितले आहे.
याबैठकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री.संजीव जैस्वाल, अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री.अब्दूलभाई शेख, माजी नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे,मजीप्रा अधिक्षक अभियंता श्री. निरभवणे, एम.आय.डी. सी.अधीक्षक अभियंता श्री. नागे, मजीप्रा कार्यकारी अभियंता श्री. बसनगार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.महाजन तसेच जलसंपदा, एम.आय.डी. सी. व पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#Shivsena

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...