ऍड हरेश वायले यांची अंबरनाथ पॅनेल अधिवक्ता म्हणून नेमणूक

अंबरनाथ -  अंबरनाथ नगरपरिषदे करीता विविध न्यायालयात परिषदेच्या बाजुने न्यायालयीन कामकाज व प्रकरण चालविणेसाठी अंबरनाथ  नगरपालिकेतर्फे ऍड हरेश वायले यांची पॅनेल अधिवक्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने  दि.२८/११/२०२० रोजी वर्तमान पत्रात जाहिरात देऊन दि. १४/१२/२०२० पर्यंत अर्ज  मागविले होते व  निकषानुसार छाननीअंती ऍड हरेश वायले यांचा अर्ज पात्र ठरल्याने   नगरपरिषदने प्रशासकीय ठराव क्र. 208 दि. 08/07/2021 नुसार वायले यांच्या  नियुक्तीला मान्यता दिली.
 ऍड.वायले यांची नियुक्ती झाल्याने  मा. दिवाणी न्यायाधिश कस्तर (CJJD) / न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC) न्यायायलय, उल्हासनगर दिवाणी न्यायाधिश क.स्तर / वस्तर (CJSD) अति. मा. जिल्हा व सत्र न्यायायलय, कल्याण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ठाणे (TDCDRF) / महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग, मुंबई येथे नगरपरिषदेच्या वतीने खटला दावे लढविणे कीरता / दाव्यातील बचाव किवा समर्थन करीता "पॅनेल अधिवक्ता" म्हणून  अटी व शर्तीच्या अधिन राहून आपली नियुक्ती करण्यात आली आहे.
ऍड. हरेश वायले यांची अंबरनाथ नगरपालिकेच्या पॅनल अधिवक्ता म्हणून नियुक्ती झाल्याने उल्हासनगर बार कौन्सिल चे अध्यक्ष ऍड. सदाशिव रणदिवे, सचिव ऍड. समीर मणौचा, ऍड. एकनाथ वाघोले, ऍड.संजय सोनवणे, ऍड.दिपक बागुल, ऍड. सचिन विशे, ऍड. रविंद्र सोनवणे व अन्य सहकाऱ्यांनी अभिनंदन केले असून हरेश वायले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...