कोरोना मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर

मुंबई :- कोरोना  मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे.

शासन निर्णय शासनाने काय म्हटले आहे
महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड १९ या आजारामुळे निधन पावली आहे, त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु.५०,०००/- (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२.हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड १९ मृत्यू प्रकरणे खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात येतील :

१) RT PCR / Molecular Tests/RAT या चाचण्यांमधून Positive अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे
अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या व्यक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड-१९ असे झाले होते, याच व्यक्तीचे प्रकरण कोव्हिड-१९ मृत्यू प्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

२)  कोव्हिड १९ प्रकरणात ज्या व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३०दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड-१९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी.

३) कोव्हिड १९ वे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड १९ वा मृत्यू समजण्यात येईल.

४) ज्या कोव्हिड-१९ च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड १९ पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १० खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form ४ व ४A मध्ये नोंदणी प्राधिका याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल.

५) Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये "कोव्हिड १९ मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील २.१ ते २.४ मधील अटीची पूर्तता होत असल्यास ती प्रकरणे रु.५०,०००/च्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील. हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने
राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.
 हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील,

१) अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

२) अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील

 (३) मृत पावलेल्या व्यक्तीवा तपशील

४) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र 

५) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र



Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...