शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेहरू सेंटर येथील कार्यक्रम बदलापूर करांनी अनुभवला वर्चुअल रॅलीच्या माध्यमातून

देशाचे जाणते नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण  खासदार  शरद पवार  ह्यांच्या वाढदिवसानिमित्य बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांची यशस्वी भवन येथे एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून मुंबई येथून प्रक्षेपण करण्यात आलेल्या वर्चुअल रॅलीच्या माध्यमातून थेट संवाद साधला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीने व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन केलं आहे. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी संवाद साधला.
हे सर्व मनोगत बदलापूर शहर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्चुअल रॅली च्या माध्यमातून ऐकले,शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना  सर्वांना पक्ष संघटन तसेच सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेतून पक्ष संघटन वाढविण्या करीता शुभेछ्या दिल्या.तसेच कार्यकर्त्यांना सामाजिक बदलाचे घटक होण्याचे आवाहन शरद पवारांनी केले. 
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस कालिदास देशमुख, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राम लिये, अनिसा खान, अनघा वारंग यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव व काँग्रेस कार्यकर्ते देखील हजर होते.
बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम स्थानांवर आणण्यासाठी प्रयत्न करणार - कॅप्टन आशिष दामले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा मूलमंत्र दिला आहे तो कायम राखत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम स्थानावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशिष दामले यांनी यावेळी केले.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...