शेतीजन्य, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पूर्व येथे शिवाजी चौक येथील वाहनतळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना प्रमुख उद्घाटक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाचनाचे महत्व अधोरेखित केले. २५ डिसेंबर ते रविवार दिनांक ९ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन साहित्य रसिकांकरिता खुले असणार आहे.
या उद्घाटनसमयी उपस्थितांशी संवाद साधताना पुस्तक प्रदर्शनातून वाचकांची साहित्यिक भूक भागवली जाते तसेच चांगल्या समाजासाठी वाचन महत्वाचे आहे आणि वाचनातूनच चांगला माणूस घडत असल्याची भावना यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. अंबरनाथ शहराचा विकास वेगाने सुरू असून अंबरनाथचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ वाढत आहे. मुंबईतील नामांकित व्यावसायिक अंबरनाथ सारख्या शहरात गुंतवणूक करत आहेत; हे विकासाचे द्योतक असल्याचे मत व्यक्त केले. आज वाचनासाठी आता ऑडिओ बुक्स, किंडल सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; तरीही पुस्तक हातात धरून वाचण्याचा आनंद अवर्णनीय आहे, असे सांगत विनामूल्य प्रवेश असलेल्या या ग्रथोत्सवाचा साहित्य रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी केले. तसेच आयोजक शेतीजन्यचे यावेळी त्यांनी भरभरून कौतुक केले.
या उद्घाटन सोहळ्यासमयी आमदार डॉ. बालाजी किणीकर, पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, इतिहास अभ्यासक सदाशीव टेटविलकर, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड, कल्याणचे तहसिलदार जयराज देशमुख, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#DrShrikantShindeFoundation #DrShrikantEknathShinde #Drbalajikinilar #arvindwalekar