बदलापूर - अंबरनाथ तहसील कार्यालय येथील अंबरनाथ मंडळ अधिकारी कार्यालयातील भ्रष्ट आणि मनमानी कारभाराच्या अनेक सुरस कथा तहसील परिसरात चर्चिला जात आहेत त्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभार अस वरदहस्त कुणाचा असाच प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
खाजगी व्यक्ती मार्फत कार्यालयातील दस्त हाताळण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच शासनाच्या विविध आदेशान्वये मनही असतानादेखील मंडळ अधिकारी कार्यालयात जवळपास तीन ते चार खाजगी व्यक्ती प्रकरणे हाताळत असतात. या व्यक्तीच् मार्फत मंडळ अधिकाऱ्यांचे देवाण-घेवाण याची गोष्टी घडतात. कोणत्या व्यक्तीकडून किती पैसे घ्यावे याचा अंदाज देखील हेच खाजगी व्यक्ती ंडळ अधिकार्यास सांगतात आणि त्याच्या सांगण्यावरून मंडळ अधिकारी आपल्या लाचेची रक्कम या हस्तका मार्फत घेत असतात. अनेक वेळा संबंधित व्यक्ती मंडल अधिकारी यांच्याशी पाठवा त्यांच्यासोबत मस्त काम सोबत संपर्क झाला नाही किंवा लाचेची रक्कम दिली नाही तर मंडलाधिकारी सदरचे प्रकरण नाकारतात आणि प्रकरणे नामंजूर करतात अशीही चर्चा आहे.
मंडळ अधिकारी यांचे भ्रष्ट आणि मनमानी कारभार खुल्या पद्धतीने सुरू असल्याचे कारण म्हणजे त्यांना कोणाचातरी वरदहस्त आहे आणि त्यामुळेच ते इतक्या बिनधास्तपणे आपला भ्रष्ट कारभार रेटत आहेत अशी देखील तहसील कार्यालय परिसरात चर्चा आहे.