मुंबई- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोभुर्ले गावी झाला. ६ जानेवारी १८३२ रोजी जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरू केलं.. त्याचं स्मरण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन किंवा दर्पण दिन साजरा करतो.
गुगलवर बाळशास्त्री जांभेकर यांची जन्म तारीख ६ जानेवारी दाखविली आहे.. त्यामुळे अनेकजण ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो अशा पोस्ट फिरवतात.. हे पूर्णतः चुकीचे आहे.. सरकारने देखील २० फेब्रुवारी हीच बाळशास्त्रींची जन्म तारीख असल्याचे स्पष्ट करून त्या दिवशी जांभेकरांची जयंती राज्यभर साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिली जात असली तरी आपण न विसरता दरवर्षी तीच चूक करीत असतो.. त्यातून आपण चुकीचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडत असतो असं होऊ नये..
माझी सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे की, ६ जानेवारीला दर्पण सुरू झाले आहे.. त्याचं स्मरण म्हणून आपण पत्रकार दिन साजरा करतो हे सर्वांना वारंवार कळवावे
१७ मे १८४६ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन झाले आहे. 6 जानेवारी दर्पण दिन साजरा करतांना काळजी घ्यावी असे आवाहन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पत्रसृष्टीला केले आहे.