३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..
बदलापूर: येथील शिवसेना शाखा क्र ७ च्या मोहनानंद नगर मांजर्ली वतीने येथे ऍड. तुषार साटपे व सौ सुवर्णा सतीश साटपे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी सुमारे ३० रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले.
ऍड. तुषार साटपे यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. तुषार साटपे यांनी आयोजित केलेले हे पाचवे रक्तदान शिबिर होते. कोरोना व ओमोक्रोन च्या वाढत्या रुग्णाचा आकडा बघता भविष्यात राज्याला रक्ताची मोठी गरज निर्माण होऊ शकते याचं पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले अशी माहिती ऍड. तुषार साटपे यांनी यावेळी दिली.
या शिबिराला शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, गटनेते श्रीधर पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, रमेश पिंगळे, विजय अहिरे, गिरीश राणे, धीरज घोलप, सतीश साटपे, सोपान पाटील, प्रभाकर पाटील, सुशीला तिवारी, संपदा लोखंडे,संजय भालेराव यांनी उपस्थिती लावली
या रक्तदान शिबिरात नियमितपणे रक्तदान करणारे प्रधुयमन कुलकर्णी यांनी ५५ वे रक्तदान आयोजक तुषार साटपे यांनी ४३ वे रक्तदान अतिष फक्के यांनी २५ वे रक्तदान मंगेश हिंदुराव यांनी २५ वे रक्तदान केले कल्याण येथील अर्पण रक्तपेढी यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सौ सुवर्णा सतीश साटपे यांनी शिबिराला आलेल्या रक्तपेढी च्या कर्मचारी वर्गाचे आभार मानले..