*बदलापूर:* शिवसेना शाखा प्रभाग क्र.७ च्या वतीने मोहनानंद नगर, शिवाशांती कॉम्प्लेक्स्, पंचरत्न परिसरात सालाबादप्रमाणे यंदा ही नवीन वर्षाच्या कॅलेंडर चे वाटप ऍड. तुषार साटपे व सौ. सुवर्णा सतीश साटपे यांच्या वतीने सुमारे २००० घरी करण्यात आले यंदाच्या कॅलेंडर चे हे आठवे वर्ष होते या वर्षीच्या कॅलेंडर हे वाशिष्ट्ये पूर्ण होते ऍड. तुषार साटपे यांनी स्वतःची जाहिरात न करता या वर्षी कॅलेंडरवर महत्वाचे दूरध्वनी क्रमांक टाकले आहेत आपत्कालीन परिस्थिती लोकांकडे नगरपालिका, वाटर सप्लाय , रेल्वे स्टेशन रक्तपेढी, बदलापूर मधील हॉस्पिटल,पोलीस स्टेशन, अंबुलेन्स , विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे नंबर आणि इतर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक नसतात त्यामुळे स्वतःची जाहिरात न करता लोकांना जे पाहिजे ते सर्व दूरध्वनी क्रमांक टाकले आहेत त्यामुळे नागरिकांना या सगळया संस्थाशी लगेच संपर्क करता येईल त्यांचं बरोबर वर्षतील सर्व दिन विशेष, जयंत्या, महत्वाच्या घटना, सण, वाढदिवस, पुण्यतिथी, लग्न, साखरपुडा, जावळ, भूमिपूजन, उपनयन, वस्तू मुहूर्त त्याशिवाय शुभ दिवस, त्याज्य दिवस यांची कॅलेंडर वर व्यवस्थित मांडणी केलेली आहे त्यामुळे नागरिकांना इतर कोणतेही नामवंत कॅलेंडर घेयची गरज भसणार नाही. या एकाच कॅलेंडर मध्ये सर्व गोष्टी सामावून घेतलेल्या आहेत कॅलेंडर चे वाटप घरोघरी केल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
कॅलेंडर चे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे व गटनेते श्रीधर पाटील काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ऍड तुषार साटपे, सुवर्णा साटपे, नंदकुमार कांबळे, रमेश पिंगळे, विजय अहिरे, सतिश साटपे, चंद्रकांत लोंगले, गिरीश राणे, सुशीला तिवारी, संपदा लोखंडे, प्रभाकर पाटील, सोपान पाटील, शैलेश गायकवाड ललित साटपे, गिरीश वाघ उपस्थिती होते