ठाणे, दि.५ (जिमाका): जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण क्षेत्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा उद्या दि.०६ जानेवारी पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे. यासंदर्भात आज आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहील. तसेच इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग फक्त अध्ययन अध्यापनासाठी विद्यार्थी व पालकांच्या संमतीनुसार सुरू ठेवता येतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
०००००