कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली  जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार राज्य सरकारने निर्बंध आणखी कडक केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी ही उद्या मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) करण्यात येणार आहे.
राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच सुधारित नियमावलीत शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मॉल्स, शॉपिंग मॉल, मैदानं, क्रीडांगणांसाठी ही निर्बंध लावण्यात आले आहेत. 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात काही आवश्यक निर्बंध लावण्यात आले आहेत. ते याप्रमाणे

◆रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू

◆मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार

◆ रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू

◆२ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार

◆राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

◆खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी

◆खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील

◆लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी

 ◆हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

◆स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा

◆२४ तास सुरु राहणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत

◆दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई

◆राज्यात प्रवेश करताना लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक

◆दुकाने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांसाठी दोन्ही डोस बंधनकारक.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...