टेक्नोसॅव्ही कल्पक कुळगांव बदलापूर नागरिकांकरिता शहरस्तरीय "स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज " स्पर्धेचे आयोजन

बदलापूर :- स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत केंद्रीय गृह निर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 'आजादी का अमृत महोत्सव' अंतर्गत समृध्द पर्यावरण साकारण्यासाठी "स्वच्छ तंत्रज्ञान आव्हान" (Swachh Technology Challenge ) घोषित करण्यात आले आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषदेमार्फत 'कुळगांव बदलापूर शहर स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आव्हान' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या चॅलेंजनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छता कार्यात सुधारणा घडवून आणणाऱ्या नव्या संकल्पनांची निर्मिती करणे आणि या स्वच्छता संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग समाज, वॉर्ड व शहर पातळीवर करणे हे उद्दिष्ट आहे. यामधून स्वच्छता विषयक नवनव्या संकल्पनांचा उदय होईल व शहर स्वच्छता कार्याला लोकसहभागातून अधिक गतीमानता लाभेल. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याकरिता नागरिकांकडून कचरा वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा, प्लास्टिक कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन, लोकसहभाग वाढीकरिता संकल्पना अशा घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेशी संबंधित विविध बाबींवरील नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रकल्प सादर केले जाणे अपेक्षित आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रामधील नागरिकांकरिता आयोजित या चॅलेंजमधील प्रथम ३ क्रमांकाच्या अभिनव तांत्रिक संकल्पना राज्यस्तरावरील चॅलेंजसाठी पाठविण्यात येणार आहेत.

कुळगांव बदलापूर शहर स्वच्छतेमध्ये नागरीकांनी नेहमीच सक्रीय सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात असलेल्या स्वच्छता कार्यातील सुधारणांविषयीच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि त्यामधून कुळगांव बदलापूर शहर स्वच्छतेला गतीमानता लाभावी हा प्रमुख उद्देश असल्याचे सांगत नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश गोडसे यांनी या अभिनव चॅलेंजमध्ये नागरिक व तांत्रिक संस्थानी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
अर्ज करण्यासाठी https://t.co/RVfNO2A2OI  या लिंक वर क्लिक करावे.@SwachhBharatGov
@SwachhMaharash1
 @SwachhMaha_22

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...