"काळ" दर्शिकेचा प्रयोग अभिमानास्पद : डॉ. गणेश मुळे

"काळ दर्शिका २०२२ " चे प्रकाशन संपन्न यावेळी डॉ. गणेश मुळे (उपसंचालक, माहिती व जनसंपर्क संचनालय, कोकण विभाग ) यांच्यासह जेष्ठ पत्रकार गिरीश त्रिवेदी, प्रवीण डोंगरदिवे, संजय साळुंके, सागर नरेकर आदी 

अंबरनाथ : "आदर्श बदलापूर" या साप्ताहिकाचे संपादक संजय साळुंके यांनी मूकनायक दिनाचे औचित्य साधून "काळ दर्शिका २०२२" हि दिनदर्शिका प्रकशित केली आहे हि बाब अभिमानास्पद असल्याचे  प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचनालय कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.    
            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी “मुकनायक" नावाचे पाक्षिक सुरु करून प्रबोधानची नवी चळवळ बहुजनांसाठी रुजविली. "मूकनायक" दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक आदर्श बदलापूरच्या वतीने “काळ दर्शिका २०२२" प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉ. गणेश मुळे यांच्या हस्ते कोकण भवन येथे करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. गणेश मुळे यांनी वरील प्रतिपादन केले. 
   आदर्श बदलापूरचे संपादक संजय साळुंके यांनी, डॉ. कुमुद कानिटकर लिखित "अंबरनाथ शिवालय" हे पुस्तक देऊन उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांचे स्वागत केले. करोनाचे नियम पळत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे प्रकाशन कोकण भवन येथील विभागीय माहिती कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी माहिती सहायक प्रवीण डोंगरदिवे, आहुति च संपादक गिरीश त्रिवेदी, सागर नरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
    समाजाने प्रयोगशील वृत्तपत्रांच्या पाठिशी उभे रहावे
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अनेक वृत्तपत्रे राज्यात आहेत. समाज प्रबोधनाची ही परंपरा अत्यंत लहान शहरात देखील सुरु आहे. ही देणगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. समाजातील सर्वस्थरातील जनतेने अशा प्रयोगशील वृत्तपत्रांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.
         'आदर्श बदलापूर' या साप्ताहिकाने “मुकनायक दिनाचे औचित्य साधून “काळ दर्शिका २०२२" या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. मराठी वृत्तपत्रांचा सुवर्णकाळ या विषयावर आधारित असलेल्या या दिनदर्शिकेत मराठी वृत्तपत्रांची माहिती प्रकाशित केली आहे, ही अभिमानाची बाब आहे. पत्रकारितेतील नव्याने येणाऱ्या पिढीसाठी ही दिनदर्शिका मार्गदर्शक, संग्राह्य ठरेल असा विश्वास डॉ. गणेश मुळे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी “मुकनायक" नावाचे पाक्षिक सुरु करून प्रबोधनाची नवी चळवळ बहुजनांसाठी रुजविली. त्याची आठवण म्हणून “दिनदर्शिका २०२२ अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले. मराठी पत्रकारितेचा खूप मोठा इतिहास आहे. मोठ्या शहरातच वृत्तपत्र क्षेत्रात प्रयोग होतात, असे नाही तर लहान शहरातून निघणाऱ्या लहान वृत्तपत्रात अनेक मोठे प्रयोग होतात,असे सांगून आदर्श बदलापूरचे संपादक संजय साळुंके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे डॉ. गणेश मुळे यांनी अभिनंदन केले.
       आदर्श बदलापूर साप्ताहिकाचे संपादक संजय साळुंके हे गेली तेरा वर्षे साप्ताहिक प्रकाशित करीत आहेत. "मूकनायक दिन" गेली दहा वर्षे सातत्याने साजरा करीत आहेत. "मूकनायक दिन दर्शिका" विविध विषयावर प्रकाशित करीत असतात. यंदाचे पाचवे वर्ष आहे.   

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...