**
दिनांक : १७, १८, १९ फेब्रुवारी, 2022
स्थळ : यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई 21.
------
राज्यभरातील तांदूळ व धान उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व शहरी नागरिकांना विविध प्रकारच्या तांदळाच्या खात्रीशीर वाणांची एकाच ठिकाणी किफायतशीर किमतीत खरेदी करता यावी या व्यापक उद्देशातून *तांदूळ महोत्सव* ही संकल्पना *यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई. श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड* आणि *ग्रोवर्स डायरेक्ट इंडिया लिमिटेड* या संस्थांच्या सहकार्यातून राबविली जात आहे.
रायगड ठाण्यातील वाडा कोलम, मावळ मुळशी चा इंद्रायणी आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ, चंद्रपूर विदर्भाचा श्रीराम कोलम, अकोले, नाशिक येथील आदिवासी उत्पादित ब्लॅक, रेड, ब्राउन राईस इत्यादी पारंपरिक तसेच संशोधित तांदळाच्या वाणांची उपलब्धता याठिकाणी असेल.
*तांदूळ महोत्सव* संकल्पनेचा एक महत्वाचा उद्देश्य हा महाराष्ट्रात पिकणाऱ्या अनेक प्रकारच्या सुगंधी व सुमधुर चवीच्या तांदळांचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर होऊन शहरी ग्राहकांना हे तांदूळ थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावेत हा आहे. विविध प्रकारच्या तांदूळ वाणांबद्दल जागरूकता वाढून ह्या वाणांची मागणी उत्तरोत्तर वाढून त्याचा दीर्घकालीन लाभ शेतकऱ्यांना होईल.
तीन दिवसाचा हा तांदूळ महोत्सव यशवंतराव सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे भरविण्यात येणार आहे. वेगवेगळ्या वाणांचे महाराष्ट्रातील ४० प्रकारचे तांदूळ, साधारण ३५ पेक्षा अधिक शेतकरी संस्था ३० स्टॉल्स मध्ये प्रदर्शित व विक्री करणार आहेत. ह्यामुळे राज्यभरातील शेतकरी व शेतकरी उत्पादक गट ह्या महोत्सवात आपले तांदूळ थेट शहरी उपभोक्त्यांना खरेदी साठी उपलब्ध होणार आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकरी आणि शेतकरी गटांनी पुढील मोबाइल नंबरवर त्वरित संपर्क साधावा - *७६६६६८६८६८, ७६६६७४७४७४