संगितकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगितकार आणि गायक बप्पी लहिरी यांचे निधन झालं आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षाचे होते.
बप्पी लहिरी यांचे मुळ नाव आलोकेश लाहिरी हे नाव आहे. त्यांचा  जन्म 27 नोव्हेंबर 1952  रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला.
 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लहरी यांनी गायली आहेत. 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...