आकाशातील दहा आश्चर्यांचा रविवारी उलगडा होणार


दा.कृ.सोमण यांचे डोंबिवली ग्रंथोत्सवात व्याख्यान 
------------
जमिनीवर राहणाऱया प्रत्येक माणसाला आकाशाबद्दल कमालीचे आकर्षण असते. याच कुतुहलातून विकसीत झालेल्या खगोल विज्ञानाने आकाशातील अनेक रहस्ये मानवाला समजली. रविवारी, २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली येथील के.बी.विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण आकाशातील निवडक दहा आश्चर्यांचा उलगडा करणार आहेत. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवली शहर शिवसेना शाखा आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवातील हा दुसरा कार्यक्रम आहे. त्यात दा.कृ.सोमण खगोल विज्ञानाने समजलेली आकाशातील रहस्ये सांगणार आहेत. 
 हे विश्व कधी व कसे निर्माण झाले ?  सूर्य कसा आणि कधी निर्माण झाला ? तो थंड कधी होणार. मग मानवाचे काय होणार ?  चंद्र नसता तर ? चंद्र पृथ्वीवर आदळेल का ?  उल्कावर्षावाच्या चित्तथरारक रात्री. लघुग्रह पृथ्वीवर आदळून जीवसृष्टी नष्ट होईल असे नासा सांगते. मग तसे का घडत नाही ? परग्रहावर जीवसृष्टी आहे का ? एलियन्स पृथ्वीवर खरोखरच आले आहेत का ?
भविष्यातील स्पेस टुरीझम कसे असेल ? आकाशातील ग्रह गोलांचा आपल्यावर परिणाम होतो का ? आदी प्रश्नांची माहिती दा.कृ.सोमण देणार आहेत. रविवार, २७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत पुस्तक प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.  

-------------------
‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’
पुस्तकाचे प्रकाशन 

याच कार्यक्रमात दा.कृ.सोमण यांच्या हस्ते ‘लाल दिव्याची वस्ती आणि निष्पाप बालपण’  या डॉ. राणी दुष्यंत खेडीकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ग्रंथालीच्या वतीने हे पुस्तक प्रकाशीत होत असून ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलापूरकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
-----------------

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...