शेतकरी ते थेट ग्राहक या विक्री उपक्रमास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतातून थेट तुमच्या घरात  अभियान आत्माअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून भरवण्यात आलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या विक्री उपक्रमास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

या आठवडी बाजारात  शेतकऱ्यांकडून आणलेला 10.5 क्विंटल भाजीपाला व शेतमाल विक्रीसाठी आणला होता.तो अवघ्यास काहीच तासात विक्री झाला. जवळपास 1200 पेक्षा जास्त पालेभाज्या अवघ्या एका तासात संपल्या. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या बाजारास लाभला.
 महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे अशा वेळेस सर्वसामान्य बदलापूरकरांना दिलासा मिळावा या हेतूने या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले. असल्याचे दामले यांनी सांगितले. हा आठवडे बाजार दर रविवारी येथे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 या आठवडे बाजाराचे उद्घाटन  कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस कालीदास देशमुख, प्रभाकर पाटील, हर्षाली गायकवाड, राम लिये, विनय सरदार, अनिल मराडे, मंगेश जाधव, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ठाणे जिल्हा परिषद सदस्य सुरेश (बाळ्या मामा)म्हात्रे यांनी ही या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...