बदलापूर : डॉ. श्री. नानासाहेव धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड ह्यांच्या तर्फे दि १ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब विष्णू तथा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ह्याच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन श्रीसमर्थ बैठक हॉल जांभूळ येथे करण्यात आले होते.
रक्त संकलनाकरीता जे.जे. महानगर रक्तपेढी मुंबई, सेंट जॉर्ज रुग्णालय रक्तपेढी मुंबई व मध्यवर्ती रुग्णालय रक्तपेढी उल्हासनगर ह्यांचे सहकार्य लाभले आहे. कार्याचा शुभारंभ आमदार किसन कथोरे ह्यांच्या व आय. टी. आय. अंबरनाथचे रिजनल मॅनेजर दत्तराज शिंदे तसेच जांभूळ ग्रापपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ व उप-सरपंच सौ. ज्योती भास्कर जाधव ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सकाळी ७.०० वाजल्या पासून श्रीसदस्य रक्तदानाकरिता येत हजर होते. संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत 1300 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.