रिझर्व्ह बॅंकेतर्फे जिल्ह्यातील महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे धडे


 
ठाणे, (): ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता येण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन व विकास आणि बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय, लीड बँक व आर्थिक साक्षरता केंद्र ठाणे याच्या सहयोगाने विभागामार्फत येथील जिल्हा नियोजन सभागृहात आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. रिजर्व्ह बॅंकेच प्रादेशिक संचालक अजय मिचयारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबई महाव्यवस्थापक कल्पना मोरे यांनी महिला दिन एक प्रेरणा दिवस असून बँकिंग व्यवहार सुरक्षित डिजिटल बँकिंग मार्फत व्यवहार करावेत. थकीत बचत गट असे लेबल लावून न घेता पत वाढवावी, असे सांगतानाच त्यांनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना मासिक बैठकीचे महत्व समजावून सांगितले.

दशसूत्री व नाट्य स्वरुपात महिला गटाच्या वैशाली जाखल व सदस्यांनी आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता याबाबत सादरीकरण केले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक नर्मदा सावंत यांनी उपस्थितांना भेछ्या देताना सगितले की बँक ऑफ महाराष्ट्रने फेब्रुवारी 2022 मध्ये महिला बचत गटांना 20 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले असून घर, वाहन, गृहपयोगी वस्तु यासाठी कर्ज घेण्यासाठी नजीकच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन केले.

          बचत गटांची ताकद मोठी असून महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्याकरिता बँकाचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक छाया शिसोदे यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री. गरमे यांनी महिलांनी सातत्याने एकत्रित प्रयत्न करून व्यवसाय उभे करावेत प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वता:ला समृद्ध करण्याचे आवाहन केले.

नाबार्डचे किशोर पडघन यांनी नाबार्ड अंतर्गत महिला गटांना दिल्या जाणआऱ्या सवलतींची माहिती दिली. रिजर्व्ह बॅंकेचे प्रबंधक श्री. कोकरे यांनी डिजिटल बँकिंग मध्ये महिलांनी सहभाग वाढवावा व सुरक्षित ऑनलाइन बँकिंग करावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत भारती यांनी मार्गदर्शन केले.

0000

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...