अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कामगारांना मुकादम या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते नुकतेच या कामगारांना माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
आरोग्य खात्यात सफाई कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या सात सफाई कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुमारे 12 वर्षे रेंगाळला होता. याबाबत पुढाकार घेऊन मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करून कामगारांना न्याय दिल्याची माहिती श्री. शेख यांनी दिली.
इडमल्ल्या मृगेश, विरन राजू, उत्तम कांबळे, शिवा कन्नस्वामी, बलविरसिंह चंडाले, विलास घुले, अनंत भोईर ह्या सात कामगारांना मुकादम पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. रसाळ आणि माजी उपनगराध्यक्ष शेख यांचे आभार मानून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.