छाया उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन थिएटर कार्यान्वित

कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयातील एन.आर.एच.एम.च्या निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटर व शवविच्छेदन कक्षाचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख श्री.गोपाळजी लांडगे साहेब यांच्या हस्ते व मुंबई आरोग्य सेवा मंडळाच्या उप संचालक डॉ. गौरी राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. 

याप्रसंगी रुग्णालयातील सुविधांचा आढावा घेत उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधत विचारपूस केली. 
या रुग्णालयात ऑपरेशन थिएटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे याकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला होता याच पद्धतीने उपजिल्हा रुग्णालयातुन अंबरनाथ व लगतच्या शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी दिली.
याकार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख श्री.चंद्रकांत बोडारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार, माजी नगराध्यक्ष श्री. विजय पवार, श्री.सुनील चौधरी, उपशहरप्रमुख श्री. परशुराम पाटील, श्री.पुरूषोत्तम उगले, श्री. संदीप मांजरेकर, श्री. गणेश कोतेकर, श्री. संजय सावंत, उपजिल्हा संघटक सौ.अंजली राऊत, विधानसभा संघटक सौ.मालती पवार, शहर संघटक सौ.नीता परदेशी, माजी नगरसेवक नंदकुमार भागवत, श्री.पद्माकर दिघे, श्री. सुभाष साळुंके, श्री.रविंद्र पाटील, श्री.विजय पाटील, श्री.तुळशीराम चौधरी, छाया उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरेश पाटोळे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...