झक मारली..........आणि प्रॉपर्टी एक्सपोला गेलो बिल्डरांच्या फोनमुळे नागरिक हैराण, घराच्या ऑफरचे फोनंमुळे होतोय नाहक त्रास


बदलापूर :

हॅलो.....
आम्ही.......या बिल्डरांच्या कार्यालयातून बोलत आहोत
आपण घर पाहताय का ?
आपणांस 1 बीएचके हवा आहे कि 2 बीएचके.....
अशा फोनमुळे प्रॉपर्टी एक्सिबिशनमध्ये उपस्थिती दर्शविणाऱ्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून नाहक त्रास सहन करावा लागतं आहे.
त्यामुळे झक  मारली.... आणि एक्स्पोला गेलो अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

बदलापूर शहरातील पूर्व भागात नारेडको आणि अंबरनाथ-बदलापूर बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते. या एक्सपोमध्ये अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील सुमारे 35 बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते. यामध्ये शहरातील विविध गृहप्रकल्प सादर करण्यात आले. या प्रदर्शनाला अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबई तसेच उपनगरातील सुमारे साडेचार हजार नागरिकांनी हजेरी लावल.  या प्रदर्शनात प्रवेश करताच स्वागत कक्षाने ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणी म्हणून नोंद करून घेतले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या शहरातील विविध बांधकाम व्यवसायिक यांच्या कार्यालयातून नोंदणी करणाऱ्या नागरिकांना फोन जाऊ लागले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध कंपनीचे फोन येत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.  एरवी कंपन्यांचे क्रमांक ग्राहकांना ओळखता येतात. मात्र बांधकाम व्यावसायिक यांच्या कार्यालयात कर्मचारी स्वतःच्या मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना फोन करत आहेत. त्यामुळे नागरिकांना या फोनचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे बदलापूरच्या प्रोपर्टी एक्सपो मध्ये अवघे 35 बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते. मात्र जे बांधकाम व्यवसायिक यातमध्ये सहभागी नव्हते त्यांच्या कार्यालयातुनंही फोन येत असल्याने मोबाइल क्रमांकाची माहिती सार्वजनिक केले गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक या मोबाईल फोनला शिव्यांची लाखोली वाहत आहेत.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...