विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; 20 जूनला मतदान

निवडणूक आयोगाने  उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची आज (बुधवारी) घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे.

 निवडणूक कार्यक्रम असा असेल 
नोटिफिकेशन - २ जून २०२२ रोजी
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस - ९ जून २०२२
उमेदवारांच्या अर्जांची छाननी - १० जून २०२२
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस - १३ जून २०२२
मतदानाचा दिनांक - २० जून २०२२
मतदानाची वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
मतमोजणीचा दिनांक - २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

'या' सभासदांचा संपतोय कार्यकाळ
सदाशिव खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रामनिवास सिंह या दहा मंत्र्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत असल्यानं या जागांवर निवडणूक होणार आहे.

कोणत्या राज्यात होतं आहे विधानपरिषद निवडणूक 2022 आणि जागा 
उत्तर प्रदेश- 13 जागा
महाराष्ट्र - 10 जागा
बिहार - 07 जागा

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...