स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या अभ्यासाचा पाया मजबूत करा - रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद

यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करत असताना त्यातील यशाचा मार्ग याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात. त्यासाठी  ‘ छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ’ बदलापूरगावं यांच्या  विद्यमाने  शतक महोत्सवी जयंती उत्सव निमित्ताने यूपीएससी आणि एमपीएससी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलं होतं.
रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद (आय पी एस) व स्नेहल लोखंडे (आय ए एस) यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
आधी आपले ध्येय निश्चित करा, आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, हे क्लिअर करून घ्या, त्याकरिता तुमचे फॉउंडेशन मजबूत करा, स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या अभ्यासाचा पाया मजबूत केला पाहिजे. अभ्यासाचा पाया मजबूत करायचा असेल तर एन.सी.ई.आर.टी. च्या पुस्तकाच्या माध्यमातून हा पाया मजबूत करता येतो. यासोबतच  प्रचंड मेहनत, जिद्दीची गरज असल्याचे कैसर खलिद यांनी यावेळी सांगितले.

 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना  अनेकदा विद्यार्थ्यांनी काही चुकीच्या गोष्टी मनात ग्राह्य धरलेल्या असतात. यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषेतून स्पर्धा परीक्षा द्यावी की मातृभाषेतून  असा तुम्हीही विचार करत असाल, तर हे चुकीचं आहे.ज्या भाषेचे आपल्याला ज्ञान आहे, तसेच आपल्याला परीक्षा देणे सोपे जाईल.  त्या भाषेतून परीक्षा दिली पाहीजे, मी स्वतः उर्दू भाषेतून प्राथमिक शिक्षण घेतले आहे पण स्पर्धा परीक्षेत भाषेचा अडथळा मला कधी आलेला नाही. मार्गदर्शन गरजेचं असतं, पण क्लास नाही, हे ध्यानात घ्या. अमुक एखादा वैकल्पिक विषय घेतला तरच, पुढे जाता येईल, हे डोक्यातून काढून टाका. मेडिकलमधून शिक्षण घेतलं असल्याने मी मेडिकल सायन्स विषय निवडायचं ठरवलं. हा स्कोअरिंग विषय नाही, असं अनेकांनी सांगितलं, पण तरीही मला यश मिळालं. तुमच्या आवडीचा विषय निवडा. अमुक एका विषयाचा ट्रेंड सुरू आहे, असं काहीच नसतं. पूर्ण वेळ अभ्यास करू शकत असाल, तरच स्पर्धा परीक्षांकडे वळा, असंही सांगितलं जातं. मी नोकरी करत पैसे कमवत अभ्यास केला. किती वेळ अभ्यासाला बसता यापेक्षा किती गुणवत्तापूर्ण अभ्यास करता, किती मन लावून अभ्यास करता याला अधिक महत्त्व आहे. कमी वेळातही उत्तम अभ्यास होऊ शकतो, हे मी स्वतःच्याच उदाहरणातून शिकले. एखादी गोष्ट घडली, तर स्वतःच्या नजरेतून तिचा विचार करा, ज्यांनी या आधी परीक्षा दिली आहे त्यांच्याशी बोला, वेगवेगळे दृष्टीकोन मिळतील. त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल.असे यावेळी रेल्वे पोलीस आयुक्त खलिद यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले.

तर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायच्या असतील तर मुलांनी फक्त आत्मविश्वास आणि सातत्य राखणे महत्वाचे आहे, असे बदलापूरचे आयएएस अधिकारी स्नेहल लोखंडे यांनी बोलताना सांगितले. आपल्याला काय अडचणी येतात त्याचे निरसन स्वतःच करायला शिका. एकाच प्रयत्नात।पास होऊ असंही समजू नका, असेही स्नेहल लोखंडे यावेळी म्हणाले. पालकांनी मुलांशी सुसंवाद राखा असेही आवाहन यावेळी दोन्ही प्रमुख वक्त्यांनी केले.

याप्रसंगी शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष कालिदास देशमुख, जिल्ह्याचे शल्य चिकित्सक।कैलास पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्त गावडे, मंडळाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...