हिललाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नेवाळी चौकीत पहिल्यांदाच लाचलुचपत विभागाची कारवाई झाली आहे. अँटी करप्शन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या उसाटणे येथील एका कंपनीत काही महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर या कंपनीवर पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.
कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेत नसल्याबाबतचे कारण सांगून कंपनीवर गुन्हा दाखल न करण्याकरीता सहाय्यक पोलीस निरीक्षण धनंजय गंणगे नेम हिललाईन पो.स्टे. यांनी स्वतःकरीता २५,०००/ रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती गणगे यांनी २०,०००/- रुपये लाचेची मागणी केली.त्या अनुषंगाने आज दि. १९/०५/२०२२ रोजी दोन पंच साक्षीदार व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून पडताळणी व सापळा कारवाई आजमावली असता, यातील लोकसेवक श्री. धनंजय गणगे, सहा पो. निरी, नेम, हिललाईन पो स्टे यांनी पडताळणीत मागणी केल्याप्रमाणे २०,०००/- रुपये तकारदार यांचेकडून स्विकारले असता धनंजय गणगे यांना पंचांचे समक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.