बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. नगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती व सूचना यांवर सुनावणी झाली. ह्या सुनावणी दरम्यान विद्यमान अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त करित नवे अधिकारी नेमून नव्याने प्रभाग रचना करावी अशी मागणी भाजपा शहर अध्यक्ष शरद तेली यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांची मुदत २०२० या वर्षात संपली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांनी निवडणुकांची प्रतिक्षा आहे. दोन्ही शहरांमध्ये २०१९ वर्षाच्या अखेरीस प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र कालांतराने राज्य शासनाने एक सदस्यीय प्रभाग पद्धती बदलून द्वीसदस्यीत प्रभाग पद्धती अंमलात आणली. त्यामुळे दोन्ही शहरातील प्रभागांची पुनर्रचना करण्याची वेळ आली. त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. १० मार्च रोजी दोन्ही नगरपालिकांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्या. या प्रभाग रचनेनंतर सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नुकत्याच दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका प्रशासनाना सूचना दिल्या. त्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या मुंबई महानगर क्षेत्रातील अ वर्ग नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० मे १४ मे या काळात सूचना आणि हकरती मागवण्यात आल्या होत्या. १४ मे रोजी मुदत संपेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडे प्रारूप प्रभाग रचनेवर ११३ या हरकतीं वर आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या समोर सुनावणी संपन्न झाली.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष शरद तेली यांनी प्रभाग रचनेत संदर्भात प्रभावी मांडणी करीत प्रारूप प्रभाग रचना ही संशयास्पद असून नियमांना बगल देऊन तयार करण्यात आलेली असे नमूद केले. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने निवडणूका घ्यायच्या असतील तर विद्यमान प्रारूप प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी केली.
नवीन अधिकार यांच्या नेतृत्वाखाली अशी मागणी केली तसेच जिल्हाधिकारी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असे शरद तेली यांनी यावेळी सांगितले.
आज संपन्न झालेल्या प्रारुप प्रभाग रचना सुनावणीदरम्यान भाजपचे संभाजी शिंदे, राजेंद्र घोरपडे, संजय भोईर, सुरज मुठे, अविनाश भोपी, रमेश सोळसे तसेच शिवसेनेचे वामन म्हात्रे, उल्हास अंबावणे, उज्वला आंबवणे, ऍड. तुषार साटपे व इतर हरकतदार तसेच जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी संतोष देहरकर, मुख्याधिकारी योगेश गोडसे,सहा. जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी भाऊ निपूरते, आदी उपस्थित होते.