अंबरनाथमधील ट्री मॅन 'राजेश जगताप'; ५०० पेक्षा जास्त भारतीय झाडांचे उभारले नक्षत्र उद्यान

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठीक ठिकाणी वृक्षरोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते

आपले भविष्य सुरक्षित आणि पुढच्या पिढीपर्यंत स्वच्छ पर्यावरण आणि शुद्ध हवा उपलब्ध ठेवायची असेल तर आजपासून वृक्षसंवर्धनाशिवाय तरणोपाय नाही. ही जाणीव बाळगून काही लोक प्रामाणिकपणे वृक्षसंवर्धनासाठी झटत असतात. वृक्षांप्रति अतोनात प्रेम आणि श्रद्धा असलेले राजेश जगताप हे सुद्धा असेच व्यक्तिमत्त्व होय. वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत प्रामाणिकतेने वृक्षांची सेवा करतानाच इतरांनाही वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करणारे राजेश जगताप हे  खऱ्या अर्थाने ‘ट्री मॅन’ ठरले आहेत.
अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील रोटरी सभागृहाच्या मागे वन विभागाची सर्व्हे नंबर ५२ येथील १.१६ हेक्टर जागा आहे. या जागे पैकी एक हजार चौरस मीटर जागेमध्ये वृक्षारोपण करण्याची लेखी परवानगी राजेश जगताप यांनी आपल्या  सामाजीक संघटनेच्या माध्यमातून घेतली . या जागेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार फंडातून स्वरक्षक भिंत  बांधून या जागेत तब्बल ५०० पेक्षा जास्त भारतीय वंशाची झाडे लावण्यात आली आहेत. ऑक्टोंबर २०११ रोजी या ठिकाणी वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली. मागील तीन वर्षात येथील नक्षत्र उद्यानातील  झाडे चांगलीच बहरली आहेत.
पर्यावरण जोपासण्याची जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही हेच राजेश जगताप यांनी आपल्या कृतीतून  दाखवून दिले आहे.

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...