बदलापूर :- येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दर्शना दामले यांच्या हस्ते सकाळी १० वाजून १० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वर्धापन दिनापासून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायमस्वरूपी उभारायचे यासोबत घराच्या दारावर पक्षाचा स्टीकर लावायचे आणि दिनांक 10 ते 16 जून रोजी राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले आहेत त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरणविषयक जनजागृती, पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या विचारांवर आधारित व्याख्यान आयोजन, याशिवाय तालुका, जिल्हास्तरावर युवक, युवती, विद्यार्थी यांच्याकरीताही वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हयातील महिला अध्यक्षांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे. असे आदेश आहेत. त्यानुसार आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून झेंडावंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व शहर पदाधिकारी उपस्थित होते.