आरक्षण सोडतीत महाविकास आघाडीला फटका, तर भाजप सेफ झोन मध्ये

बदलापूर :- बहुप्रतिक्षित नगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज संपन्न झाली. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा शहरातील सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांना फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. 
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या वडवली आणि बेलवली ठिकाणी अनुक्रमे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले आहेत. शिवसेनेचे वामन म्हात्रे, अरुण सुरवळ, राष्ट्रवादी चे आशिष दामले यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. तर भाजप चे सर्वच दिग्गज शरद तेली, संभाजी शिंदे, राजन घोरपडे, संजय भोईर यासर्व सर्वजण सेफ झोन मध्ये आले आहेत. 
राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ / नए - २०२२/ प्र.क्र.२/का.६ दि. ०९/०६/२०२२ परिशिष्ट-१ नुसार कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला होता. त्यानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम आज नगरपालिकेच्या श्रीजी सभागृहात संपन्न झाली. 
त्यानुसार एकूण  ४९ पैकी २५ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. 
नगरपालिका निवडणुकीकरिता अनुसुचित जाती करिता ७ जागा तर अनुसूचित जमाती करीत २ जागा आरक्षित आहेत त्यांची ही सोडत आज संपन्न झाली. त्यानुसार प्रभाग क्रमांक 
 ९, १२, १०, २२, १७, २३, ६ अनुसूचित जाती करिता आरक्षित झाले आहे त्यापैकी २२,१२,६ आणि ९ हे प्रभाग  अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक २ आणि १ अनुसूचित जमाती करिता आरक्षित असून त्यापैकी प्रभाग क्र.२ महिलांकरिता आरक्षित झाले आहे. 


ST - 2, 1
25 seats

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...