सुवर्णा साटपे यांचा आगळा वेगळा उपक्रम
बदलापूर: भारतीय संस्कृतीमध्ये वटपोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या सणाला महिला वडाची पूजा करत असतात मात्र गेल्या काही वर्षात वटपौर्णिमेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे झाडाची पूजा करण्याऐवजी झाडाच्या फांद्या तोडून त्याला फेऱ्या मारण्यात येतात त्यामुळे वटवृक्षाची संख्या कमी होत चालली आहे हीच गरज ओळखून सुवर्णा साटपे यांनी महिलांना दोनशे तुळशी रोपांचे वाटप केले
वट पौर्णिमेला इतिहासात अनन्यासाधारण महात्व आहे. सात जन्म हाच पती मिळावा या साठी महिला वर्ग मोठया प्रमाणात वडाची पूजा करतात उपस- तपास करतात वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घ आयुसाठी प्रयन्त करतात आपल्या श्रद्धेपोटी महिला वर्ग हे वट पौर्णिमेचे व्रत करून हे संस्कार करतात यंदा निम्मिताने निमित्ताने वडाच्या झाडाची पूजा करायला आलेल्या सुमारे 200 पेक्षा अधिक महिलांना तुळशी ची रोपे भेट म्हणून देण्यात आली तुळशीला महिलांच्या जीवनात एक वेगळे स्थान आहे तसे पाहता तुळस ची वनस्पस्ती मानवी जीवनात अतिशय महत्वाचे काम करते तुळस ही मोठया प्रमाणात प्रणवायू देते तुळशीची पाने खाल्याने अनेक रोगापासून मुक्ती मिळू शकते तसेच तुळशीच्या रसाचे सेवन केले तर स्मरणशक्ती वाढते या आणी अश्या अनेक गोष्टीसाठी तुळस उपयुक्त वनस्पती आहे
महिला वर्ग रोज सकाळी तुळशीची पूजा करतात त्यांना त्यावेळी भरपूर प्रणवायू मिळतो प्रत्येक धार्मिक विधी मध्ये तुळस ही लागतेच. मागील वर्षी सुमारे 100 वडाच्या झाडाची रोपे महिलांना भेट म्हणून देण्यात आली होती झाडें लावा, झाडें जगवा त्या मागे हा संदेश होता हल्ली बाजारातून झाडाची एक फांदी विकत आणून महिला घरचेघरी वटपौर्णिमा साजरी करतात त्यासाठी त्यांना मागील वर्षी वडाचे रोप भेट म्हणून दिले होते. वडाची पूजा करायला आलेल्या महिलांना तुळशीचे रोप भेट दिल्याने त्यांच्या मध्ये आनंदाचे व उत्साहचे वातावरण होते त्यांना यावेळी तुळस ही आरोग्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे हे पटवून देण्यात आले प्रभाग क्र 7 मध्ये दोन ठिकाणी या कार्यमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सौ सुवर्णा सतीश यांचा यांचे हे कार्यक्रम आयोजनाचे दुसरे वर्ष होते..