अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकवटले

अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आ. गुलाबराव पाटील आणि आ. डॉ. बालाजी किणीकर  यांच्या समर्थनार्थ आज अंबरनाथमध्ये  एकवटले आणि त्यांनी एकत्र येत  समर्थनार्थ घोषणाबाजी  केली. नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटले होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आहेत. यानंतर दोन दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये आमदार किणीकर यांच्याविरोधात अज्ञातांनी ‘हो मी गद्दार आहे’ असा मजकूर असलेले स्टिकर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील शिवसेनेतल्या शिंदे समर्थक गटाने आज शक्तिप्रदर्शन केलं.
शिंदे समर्थकांनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनावेळी शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, उत्तर भारतीय आघाडीचे शहर संघटक प्रमोदकुमार चौबे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे समर्थक एकत्र आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला संपवण्याची सुपारी घेतली असून, शिंदे साहेबांनी याविरोधात केलेल्या बंडाला आमचं समर्थन असल्याचं यावेळी शिंदे समर्थकांनी सांगितलं. 
 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...