आमदार बालाजी तेरेको गोली
मारनेका दिन आ गया हे हामारे
अंबरनाथ के शिवसेना नेता को
तकलीफ देता है इसिलिए तुझे
मारनेका हे बता इसलिये रहा हु
जब में मारूंगा वह दिन तय हे
तब तक टू रोज डर डर के जिये
अशा आशयाचे धमकीचे निनावी पत्र अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांना पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच किणीकर यांना ठार मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.